*डायबेटीस*– काही गोड गैरसमज

डायबेटीस (मधुमेह) तसा वैदिक काळापासून माहित असलेला आजार आहे. चरक संहितेत ह्या बद्दल माहिती आढळते. पण आजच्या काळात ह्याचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलेला आहे. 🙏बहुतेक प्रत्येकाच्या घरी एक ना एक डायबेटीस असलेली व्यक्ती आज आहे. भारतात *मधुमेहाचे प्रमाण जवळ जवळ 8 %* आहे. आज आपल्या देशात अंधत्व, किडनी चे विकार, हृदय रोग, पायाच्या जखमा विच्छेदन ह्याचे प्रमुख कारण अनियंत्रित ब्लडशुगर आहे. शिवाय Whatsapp युनिव्हर्सिटी मुळे प्रचलित गैर समजांमुळे ह्या कॉम्प्लीकॅशंस च्या प्रमाणात भर पडली आहे.

*त्यामुळे काही गैर समजाचे निरसन करण्याचा प्रयत्न आज करू या*.

** ) ” *माझ्या घरी कोणाला* *डायबेटीस नाही, त्यामुळे मला होणे शक्य नाही*.”

अनुवांशिकता हे मधुमेह होण्या मागील केवळ एक कारण आहे. बदललेली जीवन शैली, दैनंदिन ताणतणाव, अनियमित आहार, शारीरिक श्रमाचा अभाव, स्त्रियांमध्ये गर्भ धारणेचे वाढत चाललेले वय ही बाकिची कारणे कमी जास्ती प्रमाणात प्रत्येकाच्याच आयुष्यात आहे. शिवाय भारतीय वंशाच्या लोकांमध्ये शरीरात body fat चे प्रमाण हे पाश्चात्यांपेक्षा अधिक आढळते, त्यामुळे डायबेटीस हा अधिक प्रमाणात, कमी वयात तीव्र स्वरुपात आढळतो.

**) ” *मला सध्या काही त्रास नाही, तर मी ब्लडशुगर का तपासू* ?”

थकवा, वजन कमी होणे, सतत लघवी ला जाणे, सतत तहान लागणे, सतत भूक लागणे, सतत इन्फेक्शन होणे ही माहिती असलेली लक्षणे केवळ २५% डायबेटीस पेशंट्स मध्ये दिसतात.*७५% पेशंट्स मध्ये शुगर वाढलेली असून देखील कोणतीच लक्षणे नसतात*. पण ह्या ७५% लोकांना कॉम्लीकेशंस व्हायची तितकीच शक्यता असते. ते टाळण्याचा एकमेव उपाय म्हणजे वेळेत डायबेटीसचे निदान होणे जास्तीत जास्त वेळ शुगर नॉर्मल ठेवणे. म्हणून *चाळीशीनंतर* प्रत्येकाने दर वर्षी किमान एकदा अथवा गरज असल्यास शुगर तपासणी करणे आवश्यक आहे.

) ” *मी गोड खात नाही, व्यायाम करतो, म्हणून मला औषधाची गरज नाही*.”

जेव्हा एखाद्याला डायबेटीस होतो, तेव्हा त्याच्या शरीरातील इन्सुलिन तयार होण्याची क्षमता ५०% नी कमी झालेली असते , शिवाय इन्सुलिन ची कार्य क्षमता देखील कमी झालेली असते (Insulin Resistance). त्यामुळे Life Style Modification (व्यायाम, आहारातील गोड पदार्थ, कार्बोहायड्रेट उदा. भात, बटाटे कमी करणे) हे औषधा सोबत आवश्यक असते पण औषधाला पर्याय होऊ शकत नाही. केवळ प्रिडायबेटीस स्टेज मध्ये जीवन शैलीत बदल आणून बिना औषधाने शुगर नॉर्मल राहू शकते.

) *मी डायबेटीस चे औषधे घेतो, म्हणजे मी खूप आजारी आहे*.

हा सर्वात मोठा गैर समज. डायबेटीस हा आजार नसून शरीरातील एक अनियंत्रित प्रक्रिया आहे. औषधाने जीवन शैलीत बदल आणून त्यावर तुम्ही नियंत्रण मिळवता आहात. आज ब्लड शुगर नॉर्मल ठेवून (डायबेटीस असलेल्यांसाठी ” *fasting* -*उपाशी पोटी १३० mg/dl पेक्षा कमी*, 

*जेवणा नंतर* तासांनी १८० mg/dl पेक्षा कमी

 *तीन महिन्यांचे एवरेज* HbA1C  % किंवा त्याहून कमी) ठेवल्यास पुढे होणारे डायबेटीस चे कोम्प्लीकेशंस टाळता येतात.

👉🏻लक्षात ठेवा, आज औषधे घेऊन तुम्ही उद्या होणारे मोठे आजार टाळता आहात.

) *माझी शुगर नॉर्मल आहे, मी औषधे बंद करू शकतो*

तुम्ही नियमित योग्य औषधे घेत आहात, तुम्ही जीवन शैलीत योग्य बदल आणले आहेत, म्हणून शुगर नॉर्मल आहे. काही अपवाद वगळता, ते बंद केल्यास, शुगर पुन्हा वाढू शकते. वजन कमी केल्याने काही पेशंट्स मध्ये जरूर औषधे बंद होऊ शकतात, पण ते देखील डॉक्टर च्या सल्ल्याने. शिवाय काही परिस्थितींमध्ये उदा. Steroid Induced Diabetes मध्ये डॉक्टर च्या सल्ल्यानेच औषधे घ्यावे.

) *डायबेटीस चे औषधे नेहमी घेतल्याने किडनी खराब होतील*

डायबेटीसची औषधे घेतल्याने किडनीला इजा होत नाही. त्याउलट औषधे घेतल्याने ब्लड शुगर वाढलेली राहिली तर नक्कीच किडनी फेल्युअर, हार्ट अटेक इतर कॉम्प्लीकेशंस होऊ शकतात.

) *मला डॉक्टरांनी इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यायला सांगितले, इन्सुलिन इंजेक्शन घेणे वाईट असते*

Type 1 Diabetes जो प्रामुख्याने लहान मुले, किशोरवयीन मुले क्वचित मोठ्यांमध्ये आढळतो , ह्यात इन्सुलिन ला पर्याय नाही, ते जीवनावश्यक असते.

👉🏻Type 2 Diabetes जो प्रामुख्याने मोठ्यांमध्ये आढळतो, कधी कधी शुगर नॉर्मल ठेवण्या साठी इन्सुलिन च्या इंजेक्शनची गरज भासते. अशा वेळेस डॉक्टर च्या सल्ल्या नुसार इन्सुलिन इंजेक्शन घेणे यथोचित असते कारण तुम्ही गोळ्या घेता कि इन्सुलिन घेता ह्या पेक्षा तुमची शुगर नॉर्मल आहे कि नाही ह्यावर तुम्हाला कॉम्प्लीकेशंस होतील कि नाही हे अवलंबून असते. इन्सुलिन ची सवय लागण्यापेक्षा ती त्या व्यक्ती च्या शरीराची गरज असते.

8) *मी डायबेटीस सोबत दिलेले बीपी, कोलेस्टेरॉल चे औषध बंद केलेले चालेल*

काही पेशंट्स ला सोबत बीपी कोलेस्टेरॉल चे औषध दिलेले असते. डायबेटीस पेशंट्स मध्ये हृदय रोगाचे प्रमाण अधिक असते, शुगर सोबत बीपी कोलेस्टेरॉल नॉर्मल ठेवल्याने ही शक्यता आपण कमी करू शकतो, म्हणून ही औषधे घेणे गरजेचे असते.

) *उपासाच्या दिवशी, प्रवासात औषधे बंद ठेवावी लागतात*

सीवियर डायबेटीस असल्यास, वय वाढलेले असल्यास उपास करणे टाळावे. बाकी पेशंट्स नि उपासाच्या दिवशी जेवणाच्या वेळे नुसार औषधी घ्यावी, शक्यतो जेवायच्या वेळेस उपासाचे खावे, कडकडीत उपास करणे टाळावे. प्रवासात बाहेर गावी जेवायच्या औषधाच्या वेळा पाळाव्यात.

१०) *मुलाला/ मुलीला डायबेटीस आहे हे सांगितले तर लग्न जमणार नाही, नोकरी मिळणार नाही*

शुगर नियंत्रणात ठेवली तर वैवाहिक जीवनात, प्रेग्नन्सी आधी मध्ये शुगर नॉर्मल ठेवल्यास अपत्य होण्यास काहीही प्रॉब्लेम जात नाही. पण ते लपवल्याने शारीरिक त्रास तर वाढतोच पण मानसिक गुंतागुंती देखील वाढते. आवशक आहे ते योग्य उपचार करून शुगर नॉर्मल ठेवणे. शुगर ची योग्य उपाय योजना केल्यास आवश्यक ती काळजी घेतल्यास जॉब मिळण्यास करियर मध्ये देखील काही प्रॉब्लेम जात नाही.

अशा रीतीने मधुमेहाचे योग्य व्यवस्थापन करून आपण आपले आयुष्य मधुमेहासोबत देखील गोड करू शकता.

🙏 

डॉ अमेय बीडकर

हृदयरोग तज्ञ

किंग्जवे हॉस्पीटल नागपूर

  Quick Enquiry